विना स्वाक्षरीतील ७/१२ आणि डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ यांच्यातील फरक

जेव्हा कधी तुम्ही Online सातबारा उतारा काढत असता तेव्हा त्यावर तुम्ही विना स्वाक्षरीतील ७/१२ किंवा डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ असे लिहिलेले बघितले असेल. या लेखात, आम्ही तुम्हाला विना स्वाक्षरीतील ७/१२ आणि डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ यांच्यात काय फरक असतो हे सांगू. तर चला जाणून घेऊया या दोन्ही सातबाऱ्यांचा वापर कधी व कुठे करायचा असतो.

विना स्वाक्षरीतील ७/१२

विना स्वाक्षरीतील ७/१२ हा साधारण सातबारा असतो यावर कुठल्याही प्रकारची स्वाक्षरी नसते. स्वाक्षरी नसल्यामुळे आपण या सातबाऱ्याचा वापर केवळ माहितीसाठी करू शकतो. कुठल्याची सरकारी कामासाठी या सातबाऱ्याचा वापर करता येत नाही.

उपयोग विना स्वाक्षरीतील ७/१२ हा केवळ माहिती साठी वापरता येतो कुठल्याही अधिकृत कामासाठी या सातबाऱ्याचा वापर करता येत नाही.

कुठे मिळेल – Bhulekh Mahabhumi या पोर्टल वर तुम्ही विना स्वाक्षरीतील ७/१२ काढू शकता. हा सातबारा निःशुल्क प्राप्त करता येतो.


डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२

डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ वर तलाठी ची स्वाक्षरी हि डिजिटल स्वरूपात दिलेली असते त्यामुळे या सातबाऱ्याचा वापर कुठल्याही अधिकृत किंवा सरकारी कामासाठी करता येतो.

उपयोग –

  • डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ हा बँके कडून Loan घेण्यासाठी, जमीन खरेदी किंवा विक्री करायच्या वेळेस व इतर कुठल्याही सरकारी कामासाठी वापरता येतो.

कुठे मिळेल – DigitalSatbara या पोर्टल वर डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ उपलब्ध आहे. या सातबाऱ्यासाठी तुम्हाला काही फीस द्यावी लागते.


अंतिम शब्द – दोन्ही ही सातबारे अत्यंत उपयोगी आहे, त्यामुळे या दोन्हीही सातबाऱ्यांचा वापर तुम्ही तुमच्या गरजेनुसार करू शकता.

7/12 Utara Online

1 thought on “विना स्वाक्षरीतील ७/१२ आणि डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ यांच्यातील फरक”

Leave a Comment

error: