Mahabhulekh (महाराष्ट्र भूमि अभिलेख) – ७/१२ उतारा, ८अ, मालमत्ता पत्रक, भू नकाशा, इ फेरफार, आणि जमिनीची माहिती Online मिळवा.
आता तुम्ही ऑनलाइन सातबारा बघणे किंवा जमिनीशी सम्बंधित इतर सुविधांचा लाभ Online Satbara घेऊ शकता. महाराष्ट्र शासनाने महाभुलेख 7/12 Utara Online, 8A, Property Card, Bhu Naksha, ferfar आणि इतर भूमि सम्बंधित सुविंधासाठी आँनलाईन पोर्टल सुरु केले आहे.
चला तर जाणून घेऊया 7/12 कसा शोधायचा आता सामान्य माणूस घर बसल्या Mahabhulekh 7/12 उतारा काढणे किंवा इतर सुविधांचा लाभ कसा घेऊ शकेल?
- Mahabhulekh महाराष्ट्र भूमि अभिलेख
- सातबारा उतारा काय असतो?
- जमिनीचा 7/12 बंद होणार? नेमका शासन निर्णय काय?
- विना स्वाक्षरीतील 7/12, 8A आणि Property Card ऑनलाइन कसे पहावे?
- डिजिटल स्वाक्षरीतील 7/12, 8A, eFerfar, Property Card ऑनलाइन डाउनलोड कसे करावे?
- जुना ७/१२, जुने फेरफार नोंदवही Old Land Record ऑनलाइन कसे काढावे?
- फेरफाराची नोटीस/स्थिती – 7/12 Mutation (आपली चावडी)
- महाभूलेख भू नकाशा ऑनलाइन कसा काढावा?
- डिजिटल स्वाक्षरीतील 7/12, 8A, Ferfar, Property Card ही कागदपत्रे Verify कशी करावी?
Mahabhulekh महाराष्ट्र भूमि अभिलेख
महाभूलेख म्हणजे महाराष्ट्र भूमि अभिलेख (Mahabhumi Abhilekh) हे महाराष्ट्र राज्याचे लँड रेकॉर्ड पोर्टल आहे. bhulekh maharashtra या पोर्टल वर तुम्ही तुमचा सातबारा उतारा, ८अ, मालमत्ता पत्रक, फेरफार स्तिथी पाहू शकता आणि डिजिटल स्वाक्षरीतील सातबारा उतारा (digital 7/12 satbara online) सुद्धा डाउनलोड करू शकता.
सातबारा उतारा काय असतो?
Mahabhulekh सातबारा उतारा एक जमिनीचा दस्तऐवज आहे. ७/१२उतारा महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात वापरले जाते. Online 7/12 extract मध्ये तुम्हाला जमिनीचा सर्वे नंबर, मालकाचे नाव, जमिनीचे क्षेत्रफळ, बोजा आणि इतर माहिती मिळते.
जेव्हा कधी जमिनीची खरेदी-विक्री होते तेव्हा या कागदाचा जास्तीत जास्त वापर केला जातो. तसेच याचा वापर तुम्ही बँकेकडून Loan घेण्यासाठी किंवा इतर सरकारी कामांसाठी करू शकता.
जमिनीचा 7/12 बंद होणार? नेमका शासन निर्णय काय?
७/१२ उतारा हा प्रामुख्याने शेत जमीन साठी वापरला जातो. परंतु सध्याच्या काळात शहरी भागात शहरी करणामुळे शेतजमीनच शिल्लक राहिल्या नाहीत त्यामुळे भूमी अभिलेख विभागाने ठरवले आहे कि ज्या शहरांचा सिटी सर्वे झाला आहे त्या ठिकाणी Mahabhulekh ७/१२ बंद करून त्याऐवजी प्रॉपर्टी कार्ड वापरन्यात येईल.
विना स्वाक्षरीतील 7/12, 8A आणि Property Card ऑनलाइन कसे पहावे?
(Follow the Procedure to Check your Maha bhulekh 7/12 Utara, 8A Extract & Property Card)
Step 1 – अधिकृत पोर्टल ला भेट द्या (Visit the Official Portal) –
सर्वात प्रथम 7/12 उतारा काढण्यासाठी तुम्हाला अधिकृत महाभूलेख वेबसाइट ला भेट द्यावी लागेल. bhulekh.mahabhumi.gov.in हे महाभूलेख 7/12 महाराष्ट्र भूमी अभिलेख चे नवे अधिकृत लँड रेकॉर्ड पोर्टल आहे. हे mahabhulekh online portal 7/12 utara in marathi online उपलब्ध करून देते.
Step 2 – विभाग/जिल्हा निवडा (Select District/Taluka) –
महाराष्ट्र राज्यात एकूण ६ विभाग आहे त्यातून तुम्हाला तुमचा विभाग निवडायचा आहे त्यांनतर ७/१२ पहाण्यासाठी जिल्हा निवडा. विभाग निवडल्यावर तुम्हाला त्या विभागाकडे पुनर्निर्देशित करण्यात येईल. आम्ही समोर तुम्हाला 7/12 online maharashtra bhulekh विभागांची आणि जिल्ह्यांची सूची दिली आहे.
औरंगाबाद विभाग (Aurangabad Division) | Aurangabad, Beed, Jalna, Osmanabad, Nanded, Latur, Parbhani, Hingoli |
अमरावती विभाग (Amravati Division) | Akola, Amravati, Buldana, Yavatmal, Washim |
नागपूर विभाग (Nagpur Division) | Bhandara, Chandrapur, Gadchiroli, Gondia, Nagpur, Wardha |
पुणे विभाग (Pune Division) | Kolhapur, Pune, Sangli, Satara, Solapur |
कोकण विभाग (Kokan Division) | Mumbai City, Mumbai Suburban, Thane, Palghar, Raigad, Ratnagiri, Sindhudurg |
नाशिक विभाग (Nashik Division) | Ahmednagar, Dhule. Jalgaon, Nandurbar, Nashik |
Step 3 – दस्तयेवज निवडा आणि जमिनीची माहिती भरा (Select Record & Enter Land Details) –
- ७/१२
- ८अ
- मालमत्ता पत्रक
आगोदर तुम्हाला Mahabhulekh ७/१२, ८अ किंवा मालमत्ता पत्रक यापैकी कोणताही एक पर्याय निवडायचा आहे. इथे आपण ७/१२ कसा काढायचा हे बघत आहोत. नंतर तुम्हाला तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणचा पत्ता निवडायचा आहे जसे कि जिल्हा, तालुका आणि गाव (Area).
त्यानंतर तुम्ही तुमचा ७/१२, ८अ किंवा मालमत्ता पत्रक हे सर्वे नंबर, गट नंबर किंवा संपूर्ण नाव टाकून शोधू शकता. शेवटी भाषा निवडून तुमचा मोबाइल नंबर टाका आणि ७/१२ पहा या बटनावर क्लिक करा.
Step 4 – कँपच्या भरा (Fill Captcha) –
फोटो मध्ये जे शब्द दिसेल ते शब्द तुम्हाला भरावे लागेल. त्यानंतर Verify Captcha to View 7/12 बटनावर क्लिक करा.
Step 5 – ७/१२, ८अ किंवा मालमत्ता पत्रक बघा (View 7/12, 8A & Property Card) –
आता तुमच्या स्क्रीन वर तुम्हाला तुमचा महाभूलेख सातबारा उतारा, ८अ, व मालमत्ता पत्रक दिसेल. Mahabhulekh Property Card मध्ये तुम्ही जमिनीची सर्व माहिती तपासून बघू शकता. पण हा ऑनलाईन सातबारा उतारा विना स्वाक्षरीचा असल्याने तुम्ही याचा वापर कुठल्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबीसाठी नाही करू शकत.
जर करायचा असेल तर तुम्हाला तलाठी ची स्वाक्षरी व शिक्का असलेला satbara utara काढावा लागेल अथवा तुम्ही डिजिटल स्वाक्षरी असलेला आँनलाईन 7/12 maharashtra साठी काढू शकता.
सुचना –
- विना स्वाक्षरीतील 712 Utara, 8A, व मालमत्ता पत्रक तुम्हाला कुठल्याही सरकारी किंवा अधिकृत कामासाठी वापरता येणार नाही कारण यावर तलाठी स्वाक्षरी व शिक्का नसतो. यांचा वापर तुम्ही केवळ माहितीसाठी म्हणून करू शकतात.
- विना स्वाक्षरीतील दस्तावेज जवळपास सर्वच शहरांसाठी उपलब्ध असतात.
डिजिटल स्वाक्षरीतील 7/12, 8A, eFerfar, Property Card ऑनलाइन डाउनलोड कसे करावे?
(Follow the procedure to Download Digitally Signed 7/12, 8A, eFerfar, Property Card)
Digital Satbara पोर्टल भेट द्या
DigitalSatbara या पोर्टल वर तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, ई फेरफार आणि प्रॉपर्टी कार्ड ऑनलाइन डाउनलोड करता येईल. तसेच तुम्ही डिजिटल स्वाक्षरीतील हीच कागदपत्रे खरी आहे कि खोटी हे देखील या पोर्टल वर ऑनलाइन Verify करू शकता.
Step 1 – रेजिस्ट्रेशन आणि लॉगिन –
Registration –
जर का तुम्ही या पोर्टल वर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती देऊन या पोर्टल वर Register करावे लागेल अथवा तुम्ही जुने युजर असाल तर Login करून घ्या. रेजिस्ट्रेशन साठी तुम्हाला खालील माहिती भरावी लागेल.
- Personal Information
- Address Information
- Login Information
Login –
1) Regular Login – त्यानंतर रेजिस्ट्रेशन करतेवेळी तुम्ही जो Login ID आणि Password बनवला त्याचा वापर करून DigitalSatbara पोर्टल वर Regular Login करून घ्या.
2) OTP-Based Login – रेजिस्ट्रेशन न करता ही तुम्ही या पोर्टल वर मोबाइल नंबर द्वारा लॉगिन करू शकता यात तुमचा वेळ हि वाचेल. OTP-Based Login हा पर्याय निवडा आणि मोबाइल नंबर टाकून Send OTP या बटनावर क्लिक करा त्यानंतर आलेला OTP टाकून Verify OTP या बटनावर क्लिक करून लॉगिन करून घ्या.
Step 2 – Recharge Account –
डिजिटल स्वाक्षरीतील कुठलेही दस्तावेज डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला १५ रुपये चार्जेस भरावे लागतील त्यासाठी तुम्हाला अगोदार तुमचे अकाउंट रिचार्जे करावे लागतील ते करण्यासाठी Recharge Account या टॅब वर क्लिक करा आणि अमाऊंट टाका शेवटी Pay Now बटनावर क्लिक करून पैसे भरा.
Note – डिजिटल हस्ताक्षरीत दस्तावेज साठी प्रत्येकी १५ रुपये चार्जेस लागतील. |
Step 3 – दस्तावेज निवडा आणि माहिती भरा –
आता तुम्हाला जो डिजिटल स्वाक्षरीतील दस्तावेज हवा आहे तो निवडा उदाहरणासाठी आम्ही Digitally Signed ७/१२ निवडत आहोत. जर का तुमच्याकडे सातबाऱ्याचा ULPIN नंबर असेल तर तो वापरून तुम्ही लगेच तो डाउनलोड करू शकता. नसेल तर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा त्यानंतर सर्वे/गट नंबर निवडा शेवटी तुमच्या स्क्रीनवर एक पॉपअप येईल त्यातील OK बटनावर क्लिक करा.
Step 4 – डाउनलोड करा –
आता तुमच्या स्क्रीनवर Download बटण सक्रिय झाले असेल त्यावर क्लिक करून डिजिटल स्वाक्षरीतील दस्तावेज डाउनलोड करून घ्या.
सुचना –
- डिजिटल स्वाक्षरीतील दस्तावेज यांचा वापर तुम्ही कुठल्याही सरकारी अथवा कायेदशीर कामासाठी करू शकतात.
- पण हे डिजिटल स्वाक्षरीतील दस्तावेज केवळ काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध असतात.
जुना ७/१२, जुने फेरफार नोंदवही Old Land Record ऑनलाइन कसे काढावे?
जमिनीची जुनी कागदपत्रे ऑनलाइन काढण्यासाठी तुम्हाला आपले अभिलेख पोर्टल वर जावे लागेल. या पोर्टल वर तुम्हाला जुना ७/१२, जुने फेरफार आणि इतर जुनी कागदपत्रे काढता येईल.
Document Availability List/ कागदपत्रे उपलब्धता यादी
Districts / जिल्हा
- Akola / अकोला
- Amravati / अमरावती
- Dhule / धुळे
- Mumbai Suburban / मुुंबई उपनगर
- Nashik / नाशिक
- Palghar / पालघर
- Thane / ठाणे
(Follow the procedure to Download Old Land records)
Step 1 – रेजिस्ट्रेशन/लॉगिन –
आपले अभिलेख पोर्टल वर जर तुम्ही नवीन यूजर असाल तर तुम्ही तुमची खालील माहिती देऊन रेजिस्ट्रेशन करा.
- Personal Information
- Address Information
- Login Information
रजिस्ट्रेशन च्या वेळेस जो यूजरनाम अणि पासवर्ड तुम्ही बनवला तो वापरून आपले अभिलेख पोर्टल वर लॉगिन करुण घ्या.
Step 2 – दस्तावेज शोधा –
लॉगिन केल्यानंतर Basic Search या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर Exact Search हा पर्याय निवडून तुमचे ठिकाण, दस्तावेज व त्याचा प्रकार, Value टाकून Search बटनावर क्लिक करा.
Step 3 – दस्तावेज निवडा –
तुम्ही निवडलेल्या माहिती वरून तुम्हाला Search Result मध्ये दस्तावेज ची सूची दिसेल त्यातून तुम्हाला तुमचा दस्तावेज ओळखायचा आहे त्यानंतर त्या समोरील Add To Cart बटनावर क्लिक Review Cart बटनावर क्लिक करा.
Step 4 – Review Cart –
Review Cart मध्ये आल्यावर तुम्ही निवडलेल्या दस्तावेज चे पुनरावलोकन आणि Continue बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक पॉपअप येईल त्यातील OK बटनावर क्लिक करा. आता तुम्हाला थोडा वेळ थांबायचे आहे.
Note – Download बटन सक्रिय होण्यासाठी काही वेळ लगतो. |
Step 5 – डाउनलोड करा –
थोडा वेळ झाल्यावर तुम्हाला पुन्हा Review Cart या टॅब वर जायचे आहे त्यानंतर तुम्हाला डाउनलोड पर्याय तुमच्या स्क्रीनवर दिसेल. दस्तावेज बघायचा असेल तर View बटनावर क्लिक करा आणि डाउनलोड करायचा असेल तर Download Available Files या बटनावर क्लिक करा.
शेवटी तुम्ही तुमच्या जमिनीचा जुना दस्तावेज बघू शकता डाउनलोड किंवा त्याची प्रिंट सुद्धा काढू शकता.
Notes –
- जमिनीचा जुना ७/१२, फेरफार आणि इतर दस्तावेज काही निवडक शहरांसाठीच ऑनलाइन उपलब्ध आहे.
- जर का तुमचे दस्तावेज या पोर्टल वर उपलब्ध नसेल तर तुमच्या क्षेत्राच्या भूमी अभिलेख विभागात जाऊन त्यासाठी अर्ज करा.
फेरफाराची नोटीस/स्थिती – 7/12 Mutation (आपली चावडी)
फेरफार करणे म्हणजे ७/१२ उताराऱ्यात बदल करणे. वेळेनुसार ७/१२ (Land Record) मध्ये बदल होत असतात किंवा आवश्यक त्या माहिती मध्ये बदल करण्यासाठी फेरफार केला जातो.
फेरफारचे प्रकार खालील प्रमाणे:-
- खरेदी
- वारस हक्क
- बक्षीस
- देणगी
- बोजा
- इतर फेरफार
फेरफाराची नोटीस/माहिती कशी बघावी?
फेरफार नोटीस/स्थिती बघण्यासाठी तुम्हाला आपली चावडी या पोर्टल वर जावे लागेल. सर्व प्रथम तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा त्यानंतर captcha भरा आणि आपली चावडी पहा बटनावर क्लिक करा.
आता तुमच्या स्क्रीनवर निवडलेल्या ठिकाणच्या सर्व फेरफारांची सूची येईल. यात सुचित तुम्हाला नोंदणी कार्यालय, नोंदणी क्रमांक, फेरफार नंबर, फेरफाराचा प्रकार, फेरफाराचा दिनांक, हरकत नोंदवण्याची शेवटची तारीख सर्वे/गट नंबर ही सर्व माहिती मिळेल यात तुमच्या फेरफार समोरील पहा बटनावर क्लिक करा.
शेवटी तुम्हाला फेरफार नोंदीची माहिती दिसेल. फेरफार नोंदीची सूचना तलाठी कडून देण्यात येते. सूचना दिलेल्या तारखे पासून १५ दिवसाच्या आत जर का कोणी तलाठी कडे फेरफार नोंदीला हरकत नाही कळवली तर तलाठी कडून फेरफार ची पुढील प्रक्रिया राबवण्यात येते.
फेरफार अर्ज स्थिती (Mutation Application Status) कसे चेक करावे?
तुम्ही जर का ७/१२ फेरफार (७/१२ Mutation) साठी अर्ज केला असेल तर त्याची स्थिती म्हणजेच Status तुम्ही ऑनलाइन बघू शकता.
स्टेटस तुम्ही दोन प्रकारे चेक करू शकता फेरफार क्रमांक नुसार किंवा नोंदणी क्रमांक नुसार उदाहरणासाठी आपण फेरफार क्रमांक नुसार बघणार आहोत. त्यासाठी तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा त्यानंतर फेरफार क्रमांक टाकून captcha भरा शेवटी Submit बटनावर क्लिक करा.
शेवटी तुमच्या स्क्रीनवर तुमच्या फेरफार अर्जाची सध्यस्तिथी (Current Status) येईल.
महाभूलेख भू नकाशा ऑनलाइन कसा काढावा?
महा भू नकाशा म्हणजेच जमिनीचा नकाशा. यात तुम्हाला तुमच्या प्लॉट/जमिनीची सीमा आणि एकूण क्षेत्रफळ नकाशाच्या माध्यमातून दर्शवले जाते तसेच यात तुमच्या शेजारील प्लॉट/जमिनीचा Bhu Nakasha सुद्धा दर्शवला जातो.
Mahabhulekh भू नकाशा बघण्यासाठी तुमच्या जमिनीच्या ठिकाणचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा आणि त्यानंतर Plot No. टाकून सर्च करा.
Plot Info मध्ये तुम्हाला सर्वे नंबर, प्लॉट एरिया, मालकाचे नाव व अन्य माहिती दिसेल तसे बाजूला एक नकाशा दिसेल. त्यानंतर Map Report बटनावर क्लिक करा.
शेवटी तुमच्या प्लॉट चा तुम्हाला Preview दिसेल तुमच्या गरजेनुसार रिपोर्ट निवडा आणि Show Report Pdf बटनावर क्लिक करा.
Single Plot –> | यात तुम्हाला फक्त निवडलेल्या प्लॉट चा भू नकाशा दिसेल |
All Plots of Same Owner –> | यात तुम्हाला जमिनीच्या मालकाच्या वेग-वेगळ्या ठिकाणच्या सर्व जमिनींचा भू नकाशा दिसेल |
डिजिटल स्वाक्षरीतील 7/12, 8A, Ferfar, Property Card ही कागदपत्रे Verify कशी करावी?
आता DigitalSatbara पोर्टल वर तुम्ही डिजिटल स्वाक्षरीतील जमिनीची कागदपत्रे व्हेरिफाय करू शकता. व्हेरिफाय केल्याने तुम्हाला कळेल कि कागदपत्रे खोटी आहे कि खरी.
उदाहरणासाठी आम्ही ७/१२ कसा वेरीफिकेशन कसे करावे है दाखवत आहे. ७/१२ व्हेरिफाय करण्यासाठी १६ अंकी पडताळणी क्रमांक टाका जो तुमच्या ७/१२ ऱ्या वर तुम्हाला मिळेल आणि शेवटी Submit बटनावर क्लिक करा.
Land Record Portals of Maharashtra State
Bhulekh Mahabhumi (Without Signed 7/12, 8A, Malmatta Patrak) | DigitalSatbara (Digitally Signed 7/12, 8A, eFerfar,Property Card) |
विनास्वाक्षरीतील ७/१२, ८अ आणि मालमत्ता पत्रक कोणत्याही शासकीय अथवा कायदेशीर बाबींसाठी वापरता येणार नाही. | डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ आणि प्रॉपर्टी कार्ड सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येईल. |
Free (मोफत काढता येतात) | प्रत्येकी Rs 15 रुपये Charges |
विनास्वाक्षरीतील कागदपत्रे जवळपास सर्वच शहरांसाठी उपलब्ध आहे. | डिजिटल स्वाक्षरीतील कागदपत्रे ही केवळ काही निवडक शहरांसाठीच उपलब्ध आहे. |
Official Website bhulekh.mahabhumi.gov.in | Official Website digitalsatbara.mahabhumi.gov.in |
Visit –> Bhulekh Mahabhumi | Visit –> DigitalSatbara |
Important Links >>
- महाभूनकाशा – Mahabhunakasha (जमिनीचा नकाशा)
- 7/12 Correction ७/१२ चूक दुरुस्ती
- डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२ Digitally Signed 7/12
- ७/१२ फेरफार, नोटीस, स्थिती 7/12 Fefar, Notice, Status
- जुना ७/१२, जुने फेरफार नोंदवही व इतर दस्तावेज
Other Related Link >>
State Wise: Land Records
Search Land Records of India — Land Records