Aapli Chawdi (Maharashtra) गावाचे संकेतस्थळ – Check your (Mutation) फेरफार माहिती, फेरफार नोटीस, आणि फेरफार स्थिती Online.
Land Records मध्ये जेव्हा काही Changes होतात तेव्हा त्याला Property Mutation/Updation म्हणतात. यालाच आपण महाराष्ट्रात ७/१२ Ferfar असे म्हणतो तर चला जाणून घेऊया याबद्दल.
पोर्टल | Aapli Chawdi (आपली ई चावडी) |
कशासाठी | ई फेरफार नंबर, माहिती, नोटीस, स्थिती बघण्यासाठी |
अधिकृत वेबसाइट | Aapli Chavdi |
फेरफार म्हणजे काय?
फेरफार म्हणजे ७/१२ उताऱ्याच्या माहिती मध्ये बदल करणे. उदाहरणार्थ जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला जमीन विकतो तेव्हा मालकाच्या नावामध्ये बदल करण्यासाठी फेरफार करावा लागतो. फेरफार चे अनेक प्रकार असतात ते आपण पुढे बघू.
खालील सर्व Mahabhulekh ferfar online चे प्रकार आहेत. खालील कारणांसाठी तुम्ही फेरफार साठी अर्ज करू शकता.
- खरेदी
- वारस हक्क
- बक्षीस
- देणगी
- बोजा
- इतर फेरफार
फेरफार कुठे व कसे करावे?
फेरफार करण्यासाठी तुम्हाला तुमची जमीन ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणच्या तलाठी कार्यालयात जावे लागेल. तिथे गेल्यावर ७/१२ Ferfar चा Form प्राप्त करावा लागेल. ह्या अर्जात तुम्हाला तुमची व तुमच्या जमिनीची माहिती तसेच फेरफार चा प्रकार आणि फेरफार ची माहिती भरावी लागते. फेरफार जा अर्ज भरून तुम्हाला तो तलाठी कडे द्यावा लागेल सोबतच आवश्यक त्या कागदपत्र्यांची प्रति आणि Ferfar Fees द्यावी लागेल.
तुमचा अर्ज प्राप्त झाल्यावर तलाठी अर्जाची व कागद पत्रांची तपासणी करून फेरफाराची नोटीस (Ferfar Notice) व हरकत नोंदवण्याची शेवटची तारीख जाहीर करतो. जर का ह्या तारखेच्या आत कोणीही आक्षेप नाही घेतला तर तलाठी फेरफार ची पुढील प्रक्रिया राबवतो.
ह्या काळात तुम्ही आपली चावडी ई फेरफार या पोर्टल वर तुमच्या फेरफार ची माहिती, नोटीस व स्थिती (Online Ferfar Status) बघू शकता.
फेरफार ची माहिती आणि नोटीस कशी बघावी?
फेरफार ची माहिती आणि नोटीस ऑनलाइन बघण्यासाठी तुम्ही आपली चावडी या पोर्टल चा वापर करू शकता.
Step 1 – Select Location –
आपली चावडी पोर्टल वर गेल्यावर सर्वात अगोदर तुम्हाला दस्तावेज निवडून तुमचे ठिकाण निवडायचे आहे त्यासाठी तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. शेवटी Captcha भरून आपली चावडी पहा बटनावर क्लिक करा.
Step 2 – Ferfar Details –
आता तुम्ही निवडलेल्या ठिकाणच्या सर्व फेरफार ची माहिती तुमच्या स्क्रीनवर येईल यात तुम्हाला ज्या फेरफारची नोटीस बघायची असेल त्या समोरील पहा बटनावर क्लिक करा.
Step 3 – Ferfar Notice –
शेवटी तुमच्या समोर फेरफार नोटिस येईल त्यात तुम्हाला फेरफार बद्दल सर्व माहिती मिळून जाईल.
फेरफार स्थिती (Mutation Status)
फेरफार ची स्थिती बघण्यासाठी Mutation Status या वेबपेज वर जा.
सर्वात अगोदर ७/१२ फेरफार स्थिती बघण्यासाठी फेरफार क्रमांकानुसार किंवा नोंदणी क्रमांकानुसार या दोन्ही पैकी एक पर्याय निवडा.
त्यानंतर तुमचा जिल्हा, तालुका आणि गाव निवडून तुमचे ठिकाण निवडा शेवटी क्रमांक टाकून कॅप्टचा टाका आणि Submit बटनावर क्लिक करा. तुमच्या स्क्रीनवर फेरफार ची सध्यस्थिती (Current Status) येईल.
टिप –
- ७/१२ फेरफार करण्यासाठी किंवा अधिक माहिती साठी तुमच्या तलाठी कार्यालयाला भेट देऊ शकता.
Important Links
विना स्वाक्षरीतील 7/12, 8A आणि Property Card | Mahabhunakasha (महाभूनकाशा) जमिनीचा नकाशा |
डिजिटल स्वाक्षरीतील ७/१२, ८अ, ई-फेरफार, मालमत्ता पत्रक | Aaple Abhilekh (जुने ७/१२, आणि जमिनीची जुनी कागद पत्रे) |
Yes, you can use the Aapli Chawdi 7/12 portal to download Ferfar. We have written about this topic on our website.
होय, तुम्ही Ferfar डाउनलोड करण्यासाठी आपली चावडी पोर्टल वापरू शकता. आम्ही या विषयावर आमच्या वेबसाइटवर लिहिले आहे.
हरकत नोंदवण्याची शेवटची तारीख का नाहि दिसत आहे ? ३ महिने झाले deal हो होऊन.
online pherphar kasa kadhava